'त्या' बेपत्ता महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला

आगरा - सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस पास झालेली एका तरुण डॉक्टर दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या भावाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर बुधवारी या तरुणीचा मृतदेह शहरापासून दूर काही किलोमीटर अंतरावर सापडला आहे. एका फ्लॅटमध्ये त्यांचे शव मिळाले. 

पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. योगिता गौतम असं मृत डॉक्टर तरुणीचं नाव आहे. तिच्याच महाविद्यालयातील एक सिनियर डॉक्टर तिला छळत असल्याचा आरोप तरुणीच्या वडिलांनी केला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी योगिताचा सिनियर असलेला संशयित आरोपी डॉ. विवेक तिवारीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

डॉ. मोहिंदरकुमार गौतम यांनी या बहिणीच्या अपहरणाची माहिती पोलिसांना दिली होती. त्यांनी सांगितले की त्यांच्या बहिणीने सन २००९ मध्ये मुरादाबादच्या तीर्थंकर महावीर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. तेव्हा तिची ओळख डॉ. विवेक तिवारीसोबत झाली होती. डॉ. विवेक तिवारी योगिताहून एक वर्ष सिनियर आहे. मंगळवारी डॉ. तिवारीने योगिताला जबरदस्तीने गाडीत खेचत नेले. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. 

योगिताकडे विवेकने लग्नासाठी तगादा लावला होता. योगिताला मात्र त्याच्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नव्हते. याचा राग डोक्यात घेऊन त्यानं योगिताची डिग्री रद्द करण्याची धमकीही दिली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. पोलिसांचा तपास सुरू असून आरोपी डॉ. तिवारीला पोलिसांनी अपहरण आणि हत्या केल्याचा गुन्हा दाखल करीत ताब्यात घेतले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !