हा समारंभ प्रत्येक वेळी राष्ट्रपती भवनात होत असतो. यामध्ये खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार व ध्यानचंद पुरस्काराचे वितरण केले जाते. कोरोनामुळे यंदा पुरस्कारासाठी पहिल्यांदा ई-मेलद्वारे अर्ज मागवण्यात आले आहेत. नेहमी प्रमाणे नामांकन पाठवण्याची प्रक्रिया एप्रिलमध्ये सुरू होते. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे मेमध्ये अर्ज मागवण्यात आले होते.
क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले की, आम्हाला राष्ट्रपती भवनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यांच्या निर्णयानंतर या सोहळ्याचे नियोजन करावे लागणार आहे कोरोनामुळे यंदा सगळ्याच गोष्टी रद्द करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे हा पुरस्कार वितरण सोहळा रद्द झाल्यास फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. फारतर एक दोन महिने हा सोहळा पुढे ढकलला जाऊ शकतो.
यांचा होणार सन्मान
क्रिकेटपटू रोहित शर्मा, अॅथलिट हिमा दास आणि कुस्तीपटू विनेश फोगाट यांचे नाव यंदा खेलरत्न पुरस्कारासाठी पाठवण्यात आलेले आहे. तर भाला फेकपटू नीरज चाेपडा, टेबल टेनिसपटू मणिका बत्रा आणि भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालचे नाव देखील खेलरत्नसाठी पाठवलेले आहे.