कमलेश पाटील मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष

मुंबई - कमलेश पाटील यांची मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. समाजातील 36 जाती पाती यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते व संघटक कमलेश पाटील यांची नुकतीच या पदावर नियुक्ती करण्यात आली. पाटील हे १७ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
मागील दोन वर्षात पाटील यांनी राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, चंदिगड, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार या राज्यांमध्ये मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड तसेच वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे संघटन केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर आता ही नवी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे, अशी माहिती मराठा सेवा संघाचे प्रसिद्धीप्रमुख पंकज कणसे यांनी दिली आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !