टेक्नॉलॉजी - एकीकडे मोबाईलचे प्लॅन महागडे झाले आहेत. त्यामुळे मोबाईलधारक चिंतेत आहेत. परंतु, देशातील सर्वात मोठी खासगी मोबाईल कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी फायदेशी प्लॅन लाँच केले आहेत. जिओने सर्व गटातील प्रीपेड प्लान आणले आहेत. त्यापैकी दोन प्लान असे आहेत की त्यामध्ये वर्षभराची वैधता तसेच ७३० जीबी डेटा उपलब्ध आहे.
रिलायन्स जिओ ही मुकेश अंबानी यांच्या मालकीची कंपनी आहे. या कंपनीकडे सध्या २ जीबी , ३ जीबी, १.५ जीबी, १ जीबी डेटा दररोजचे प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. कंपनीकडे २ जीबी डेटा दररोज मिळणारे दोन प्लान आहेत. हे दोन्ही प्लॅन वर्षभराची वैधता देतात. म्हणजेच दररोज रिचार्ज करण्याची समस्या आता संपणार आहे. तसेच या प्लानमध्ये जबरदस्त डेटा सुद्धा ग्राहकांना मिळणार आहे.
जिओचा २५९९ रुपयांचा प्लानची वैधता एका वर्षाची आहे. या प्लानमध्ये २ जीबी डेटा मिळतो. तसेच कंपनी १० जीबी डेटा अतिरिक्त देते. म्हणजेच एकूण या प्लानमध्ये ७४० जीबी डेटा युजर्संना मिळतो. याशिवाय ग्राहकांना जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर अन्य नेटवर्कवर १२ हजार कॉलिंग मिनिट्स मिळतात. तसेच दररोज १०० एसएमएस फ्री मिळतात.
तर आणखी एका प्लॅनची वैधता वर्षभर आहे. २३९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. एकूण या प्लानमध्ये ७३० जीबी डेटाचा फायदा मिळतो. जिओ ते जिओवर अनलिमिटेड आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग साठी १२ हजार कॉलिंग मिनिट्स मिळतात. रिलायन्स जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात.