मुंबई - दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांनी गणरायाच्या मूर्तीच्या पाटाखाली देशाचे संविधान ठेवले. अन् साेशल मिडियावर ऑनलाईन असलेले चांगलेच भडकले. तरडे यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर ट्रोल केल्यानंतर प्रविण तरडे यांनी एक व्हिडिओ शेअर केला. त्यात तरडे यांनी आपल्या हातातून झालेली चूक मान्य करीत सर्वांची माफीही मागितली. परंतु तरीही वाद संपलेला नाही.
Photo credit : MarathiStars.com/Twitter |
दिग्दर्शक प्रवीण तरडे व्हिडिओत म्हणाले की, मी माझ्या घरी या वर्षी पुस्तक बाप्पा अशी संकल्पना केली होती. पण, यावेळी माझ्याकडून चूक झाली. गणरायाच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधान ठेवले होते. कारण, गणराय हा बुद्धीचा आणि कलेचा दैवता आहे. त्यामुळे अशी माझी भावना होती. पण, ती खूप मोठी चूक होती. ही चूक मला अनेकांनी फोन करुन निर्दशनास आणून दिली, असं प्रवीण तरडे यांनी सांगितले.
तसेच मी माझी चूक सुधारली असून पुन्हा अशी चूक होणार नाही, असेही प्रवीण तरडे यांनी सांगितले आहे. परंतु, तरडे यांच्या काही चाहत्यांनी त्यांची बाजू घेतली आहे. तरडे यांनी संविधनाचा आदर होता, म्हणूनच त्यांनी पुस्तक बाप्पा ही संकल्पना राबवताना संविधानाची प्रत घेतली. अन्यथा त्यांनी दुसरे कोणतेही पुस्तक ठेवता आले असते, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.
अशा पद्धतीने सोशल मिडियावर ट्रोल करुन एखाद्याला माफी मागायला लावणे हे चुकीचे आहे. बरं कुणाच्या भावना दुखावल्या म्हणून तरडे यांनी माफी मागितली तरी त्यांच्यावर टीका करणे कितपत योग्य आहे, असेही तरडे यांची बाजू घेणाऱ्यांचे म्हणणे आहे.