त्यामुळे आयपीएलमधील जवळपास ३० खेळाडू यूएईमधून देशात परतणार नाहीत. ते थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. तर ३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेत ४ कसोटी आणि ३ वनडे खेळणार आहे. खेळाडू ऑगस्टमध्ये यूएईत पोहोचणार आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये अखेरचा वनडे १७ जानेवारी रोजी खेळवला जाईल. म्हणजे अव्वल खेळाडू पाच महिने देशात परतणार नाहीत.
आयपीएलचा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी २५ पेक्षा अधिक खेळाडूंची निवड केली जाऊ शकते. कारण कोविड-१९ मुळे कोणता खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या जागी दुसऱ्याला संधी मिळेल. यापूर्वी विंडीज व पाकिस्तानचे देखील २५ पेक्षा अधिक सदस्य असलेली टीम इंग्लंड दौऱ्यात गेली होती. त्यासह संघाला कसोटी व वनडे दोन्ही मालिका खेळायच्या आहेत.