नवी दिल्ली - चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने चीनचे आणखी ४७ अँड्रॉइड ऍप्सवर बंदी घातली आहे. भारत सरकारचा हा चीनवर करण्यात आलेला 'डिजिटल सर्जिकल स्ट्राईक' म्हणून ओळखला जात आहे. भारतीयांची ताकद दाखवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
भारताच्या अखंडता, आणि सरकारविरोधी असल्याचा आरोप करीत ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही 'टिकटॉक' या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अँपवर भारत सरकारने बंदी घातली होती. याचा मोठा फटका चीनला बसलेला आहे. गेल्या महिन्यात भारत चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले होते.
या चकमकीपासून संपूर्ण देशात चीनविरोधी संतापाची लाट उसळलेली आहे. जागतिक पातळीवर देखील भारताच्या बाजूने अनेक देश उभे ठाकले आहेत. भारताचा जुना मित्र असलेला रशिया देशही भारताच्या बाजूने आलेला आहे. जागतिक पातळीवर चीनला एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच अँड्रॉइड एप्सवर बंदी घालून भारताने चीनला आणखी मोठा धक्का दिला आहे.