गुलजार म्हणाले होते, "प्रशांत शुक्र है, की तुमने वो बात थाम ली है.."

'गुलजार' आणि नगरकरांचे अतूट नाते..

अहमदनगर - ज्येष्ठ कवी, शायर आणि दिग्दर्शक गुलजार यांनी नुकतेच ८६ व्या वर्षात पदार्पण केले. गुलजार यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा तर दिल्याच, पण अहमदनगरवासीयांनीही गुलजार यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. सोनई येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रशांत गडाख यांनी गुलजार यांचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

गुलजार आणि नगरकरांचं नातं अतूट आहे. मराठी साहित्य संमेलन असो किंवा सोनई येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठान संचलित कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा. नगरकरांनी जेव्हा-जेव्हा प्रेमाने साद घातली तेव्हा त्याला प्रतिसाद देत गुलजार नगरमध्ये आलेले आहेत. सन १९९६ मध्ये अहमदनगर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गुलजार नगरला आले होते.

सोनईच्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने २६ जानेवारी २०१३ रोजी गुलजार यांना कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याच कार्यक्रमाचा व्हिडीओ अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी फेसबुकवर शेअर करत गुलजार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालेल्या युवकांचे संघटनाचे गुलजार यांनी कौतुक केले होते. 

आपण सतरा वर्षांपूर्वी बोललेले शब्द प्रशांतने नेमके पकडले आणि येथे युवकांचे संघटन करुन त्यांना चांगली दिशा देण्याचे काम केले. युवकांना सामाजिक कार्याची ओढ लावली, हे पाहून आता खरंच चांगले वाटले, असे गुलजार यांनी सांगितले होते. या व्हिडिओतून गुलजार यांचे नगरकरांविषयी असलेले प्रेम आणि जिव्हाळा दिसून येतो. गुलजार नेमके काय म्हणाले होते, ते सोबतच्या व्हिडिओत पहा.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !