मनमाड - नांदगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघा जणांचा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांची झोपेत असतानाच गळे चिरून हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे मनमाड शहरात दहशत निर्माण झाली आहे.
नांदगाव तालुक्यातील वखारी येथे हे क्रूर हत्याकांड घडले आहे. वखारी गावात राहणाऱ्या चव्हाण कुटुंबातील चार चणांची हत्या झाली आहे. यामध्ये आई-वडिल आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. गुरुवारी मध्यरात्री मारेकऱ्याने ३७ वर्षीय समाधान चव्हाण, ३२ वर्षीय पत्नी भरताबाई, ६ आणि ४ वर्षीय दोन मुलं गणेश आणि आरोही अशा चौघांची झोपेतच हत्या केली.
अद्याप या हत्याकांडामागील कारण समजलेले नाही. पोलिसांनी चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिस या प्रकरणाचा कसून अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.