राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ३४ फूट ६ इंचावर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ९० बंधारे पाण्याखाली गेले आहेत.पंचगंगेचे इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांना आतपासूनच सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
जिल्ह्यामध्ये गेले दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. गगनबावडा राजमहामार्गावर मांडुकली आणि शेनवडे गावाजवळ पावसाचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे कोकणात जाणारा हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांनी त्वरित स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.