नवी दिल्ली - भारतीय ग्रुप असलेल्या MSN कंपनीने कोरोनावरील सर्वात स्वस्त औषध 'फेविलो' लाँच केले आहे. २०० एमजीच्या एका टॅबलेटची किंमत ३३ रुपये आहे. फेविलोमध्ये अँटी-व्हायरल ड्रग फेविपिराविरचा डोज आहे, हैदराबादची जेनरिक फार्मा कंपनी MSN ग्रुप लवकरच फेविपिराविरची ४०० एमजीची टॅबलेट लॉन्च करणार आहे. आतापर्यंतचे सर्वात स्वस्त औषध असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
ग्रुपचे सीएमडी डॉ. एमएसएन रेड्डी म्हणाले की, फेविलो कोविड-19 चे सर्वात प्रभावी आणि परवडणारे औषध आहे. आमची कंपनी औषधांची गुणवत्ता लक्षात ठेवण्यासोबतच लोकांना उपलब्ध करुन देण्यावर विश्वास ठेवते. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून फेविपिराविरला कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मंजूरी मिळाली आहे. या औषधाने कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षण आढळणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जातील.