कोरोनाचे खरे वास्तव.. आणि समज-गैरसमज

रोडोची लोकसंख्या असणारा आपला देशात लाखो लोक रोज कोरोना विषाणूच्या संपर्कात येतात. त्यातील हजारो लोकांना बाधा होते आणि बाधित हजारो लोकांमधून  थोड्या लोकांना त्यांच्या प्रतिकार शक्तीपरत्वे त्रास होतो. त्यालील खूप कमी रुग्ण अत्यवस्थ  होतात आणि काही प्रमाणात मृत्युही ओढवला जातो. त्यामुळे सर्वांनीच अत्यंत घाबरुन जाण्याचे काहीही कारण नाही, अन् निष्काळजीपणा दर्शवण्याचे धाडसही करु नये.


लक्षणे:-
१)      ताप
२)      सर्दी. खोकला
३)      घसा दुखणे
४)      नाकातून पाणी येणे
५)      थंडी वाजणे
६)      डोकेदुखी
७)      थकवा
८)      भूक  कमी लागणे
९)      काही रुग्णांमध्ये जुलाब आणि उलटी

लहान मुलांमध्ये:-
१)      श्वास घेण्यास त्रास
२)      उलटी होणे
३)      ताप थंडी

मोठ्या रुग्णांमध्ये :-
१)       श्वास घेण्यास त्रास
२)      छातीत किव्हा पोटामध्ये दाब येणे
३)      थकवा
४)      कमजोरी

विशेष काळजी घ्यावे लागणारे रुग्ण किवा लोक :-
१)      गरोदर स्रिया
२)      १ वर्ष खालील बालके
३)      ६५ पेक्षा अधिक वृद्ध
४)      हृदय विकार ग्रस्त
५)      एड्स बाधित रुग्ण
६)      हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि परमेडीकॅल स्टाफ

आजकाल वाढते सोशल मेडियामुळे खूप गोष्टी झटपट फैलावल्या जातात. त्यातूनच  खूप समज - गैरसमज वाढत जातात. काल परवापासून मला खूप जणांनी काही होमिओपॅथिक औषधीबद्दल विचारणा केली. तर काही जण एक कापुर आणि लवंग, विलायची विषयी विचारत आहेत. भारतात नव्हे तर प्रत्येक गावात खूप मंदिरे आहेत आणि कापराने जर विषाणू मरत असतील तर कोरोना आपल्याकडे आलाच नसता. कारण रोज कमीत कमी टनभर कापुर भारतात जाळला जात असेल. असो..
  
कुठल्याही विषाणू जन्य आजारासाठी प्रतिकार शक्ती वाढवणे हाच एकमेव उपचार तरी सध्या अस्तित्वात आहे.
या आजाराचे सोप्या पद्धतीने कसे उपचार करावेत ? हा यक्षप्रश्न आहे.

Immunomodulation is  only  way  to combact  CORONA 

Immunomodulation  थोडक्यात आणि सोप्प्या भाषेत सांगायचे ठरले तर प्रतिकार शक्ती उत्तेजित करून वाढवणे. हे कसे शक्य आहे. तर नक्कीच शक्य आहे.

हे तीन  प्रकारे होऊ शकते -
१)      लसीकरण
२)      होमिओपॅथिक औषधी
३)      जिवाणू / विषाणुचा संपर्क

लसीकरण :-
लसीकरण करून काही  विषाणु जन्य आजारांपासून मुक्तता मिळु शकते, पण सध्या VACCINE तयार करून त्यांची उपयुक्त्तता तपासणे आणि त्याची उपाययोजना करणे सध्या तरी शक्य नाही.

होमिओपॅथिक औषधी :-
ही उपचार पद्धती नैसर्गिक तत्वावर SIMILIA SIMIBUS CURANTER  आहे. सम समा; समायन्ति थोडक्यात काट्याने काटा काढणे. या उपचार पद्धतीमध्ये अशी काही औषधी दिली जातात कि जिच्यामध्ये आजारासारखी लक्षणे तयार करण्याची क्षमता आहे. त्यातून प्रतिकार शक्ती वाढून विषाणुजण्य आजारांपासून खूप सहजरित्या विजय मिळवू शकतो. 

विषाणुचा संपर्क :-  ( HERD IMMUNIZATION )
संपर्कानंतर जर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर ANTIGEN-ANTIBODY प्रक्रिया होऊन त्याच्या विरोधात प्रतिकार शक्ती निर्माण होते. अशा वेळी कुठलाही त्रास अथवा लक्षणे जाणवत नाही.

थोडक्यात प्रतिकार शक्ती वाढवा आणि आजार टाळा..

साथीच्या आजाराच्या लक्षणावरून साथीसाठी काही विशेष होमिओपथिक औषधी,  प्रतिकार शक्ती वाढवुन आजार प्रतिबंधही करू शकतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर जेवण, पौष्टिक आहार, व्यायाम घ्या, तंदुरस्त राहा आणि कोरोना टाळा. काळजी घ्या !

डॉ. संजय सोनवणे पाटील,
आनंद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,
अहमदनगर,
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !