जबरदस्त ! आयपीएलमधून 'चिनी' जाहिराती 'आऊट'

नवी दिल्ली - चीनबद्दल जगभरात वाढत चाललेल्या रोषात आणखी भर पडली आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेची मुख्य प्रायोजक असलेली व्हिवो कंपनीने आपले प्रायोजकत्व मागे घेतले आहे. इतकेच नाही, तर यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चीनच्या जाहिरातींवर बंदी असणार आहे. यात प्रामुख्याने व्हिवो, ओपो, रिअल मी, शाओमी, हुआवेसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. 
चीनविरुद्ध नागरिकांच्या नकारात्मक विचारामुळे विविध कंपन्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. यावर्षी आयपीएल सामन्यांमध्ये जाहिरातींवर व्हिवो व ओपेने सर्वाधिक खर्च केला होता. परंतु, त्यांचा हा खर्च आता पाण्यात जाणार आहे. गेल्या वर्षी टीव्ही आणि डिजिटल जाहिरातीतून स्टार इंडियाला २२०० कोटी रुपये मिळाले होते. व्हिवो व ओपेने गेल्या वर्षी जाहिरातीवर २४० कोटी रुपये खर्च केले होते. 

यंदा मात्र, आयपीएल स्पर्धेच्या काळात चीनला अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आयपीएलसोबतच प्रो कबड्डी लीगच्या मुख्य प्रायोजकातून देखील व्हिवो कंपनीने बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेही कोरोना विषाणूच्या संसंर्गाच्या भीतीने यंदा आयपीएल स्पधेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तरीही परदेशात ही स्पर्धा होत असून यंदा मात्र जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न कमीच असणार आहे. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !