'पॉलिटेक्निक'ची प्रवेशप्रक्रिया सुरु

२५ ऑगस्ट पर्यंत चालणार, सर्व प्रक्रिया ऑनलाईन 

मुंबई -  तंत्रशिक्षण ( पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष  पदविका अभ्यासक्रमांची शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीताची प्रवेशप्रक्रिया दिनांक १० ऑगस्ट २०२० ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत राबविणार असल्याची माहीती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

उदय सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधाकेंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने गतवर्षीप्रमाणे वरील पैकी सुविधा केंद्रास भेट देऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती सोबतच  ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्या पर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन माध्यमातून करू शकतील. 

सर्व प्रक्रिया ऑनलाईन 

प्रवेशासंबंधी सुविधा केंद्रांची यादी  आणि e-Scrutiny  पद्धतीची माहिती ,अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती, हेल्पलाईन क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती http://www.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे,असेही श्री. सामंत यांनी संगितले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !