अमेरिकेत मुके प्राणीही कोरोनाच्या विळख्यात

वृत्तसंस्था - कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभर थैमान घातले आहे. विविध देशांत या आजारामुळे मृत्यू पावणारांची संख्या लाखांमध्ये आहे. पण, अमेरिकेत ७ वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली आहे. नॅशनल जिओग्राफिक या मासिकाने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे कोरोनाची व्याप्ती समोर आली आहे.

कोरोना विषाणूची लागण झालेल्या कुत्र्याचे नाव ‘बडी’ असे आहे. कोरोना विषाणूची लागण झालेला हा पहिलाच कुत्रा आहे. एप्रिल महिन्यात तो आजारी पडला होता. त्याचवेळी त्याचा मालक रॉबर्ट महोनी कोरोनामुक्त झाला होता. एप्रिलच्या मध्यात त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर काही आठवड्यानंतर या कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली.

परंतु, उपचार केल्यानंतर या कुत्र्याची प्रकृती स्थिर झाली. पण पुन्हा ११ जुलै रोजी या कुत्र्याची प्रकृती खालावली. त्याने रक्ताच्या उलट्या करायला सुरुवात केली. त्याच्या मूत्राशयातूनही रक्त येत होते. त्याचवेळी त्याचा मृत्यू झाला. प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरसचा पुरेसा डेटा नव्हता. तसेच पशुवैद्यकीय दवाखाने बंद होते. अमेरिकेत सध्या १२ कुत्री, १० मांजरी, १ वाघ आणि एका सिंहाला कोरोनाची लागण झाली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !