देशात कोरोना रुग्णसंख्या २६ लाखांहून अधिक

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांनी रविवारी २६ लाखांचा आकडा ओलांडला आहे. आतापर्यंत देशभरात २६ लाख ४१ हजार २९६ रुग्ण झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी १९ लाख ११ हजार २९२ रुग्ण ठीक झाले आहेत. तर आतापर्यंत देशभरात ५० हजार ९६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या देशात एकूण ६ लाख ७८ हजार ५३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्ण पुणे शहरात आहेत. पुण्याात आतापर्यंत १ लाख २७ हजार ५१८ रुग्ण कोरोना बाधित आढळलेे आहेत. यातील ४१,०८० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर ८३,३०८ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३,१३० रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. मुंबई शहरात १ लाख २७ हजार ७१६ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील १७,५८१ रुग्णांवर उपचार सुरू असून, १ लाख २ हजार ७४९ रुग्ण बरे झाले आहेत.

उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचा मृत्यू

माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री चेतन चौहान यांचे रविवारी निधन झाले. ते ७३ वर्षांचेे होते. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना गुरुग्रामधील मेदांता हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मागच्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या निधनामुळे युपी सरकारला मोठा धक्का बसला आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !