मुंबई - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना नागपुर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आता त्यांना तेथून मुंबईत हलवण्यात येणार आहे. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.
खासदार नवनीत राणा यांच्यासोबत आमदार रवी राणादेखील मुंबईला रवाना होणार आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू होते. मात्र त्रास वाढल्याने त्या आता मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार आहेत. श्वास घ्यायला त्रास होत असून नवनीत राणा यांच्या छातीत मोठ्या प्रमाणावर दुखतं असल्याची माहिती मिळाली आहे.
राणा यांच्या मुला-मुलीसह १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर नवीनत राणाही कोरोना पॉझिटिव्ह आल्या. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही संसर्ग झाला होता. सासु-सासऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नवनीत राणा यांची तब्येत बिघडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चिंता वाढली आहे. (image : TWITTER)