पुण्यात रविवारी २५८५ जणांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत २ लाख ८१ हजार ८४० एवढ्या चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत ६३९ रुग्णांची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यापैकी ३९२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर अतिदक्षता विभागात २४७ रुग्ण आहेत.
ससून रुग्णालयात ऑक्सिजनसज्ज असलेल्या आणखी ३२५ बेड्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. येत्या काही आठवड्यात ससून रुग्णालयातही करोनाग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात बेड्सची सुविधा वाढणार आहे. राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ९ हजार ५०९ रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी २९० जणांचा करोनानं मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५३ टक्के इतका आहे.