रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्क्यांहून अधिक
रविवारी ५७६ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
तर नव्याने वाढले ४७ रुग्ण
अहमदनगर - जिल्ह्यात कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने द्दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी ५७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १० हजार ८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७८.०५ टक्के इतकी आहे. दरम्यान, शनिवारी) सायंकाळी ६ वाजेपासून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४७ ने वाढ झाली आहे.
त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६८२ इतकी झाली आहे. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २७, पाथर्डी ३, नगर ग्रामिण १०, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट २ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी एकूण ५७६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये..
अहमदनगर मनपा २५३,
संगमनेर ३८,
राहाता २७,
पाथर्डी ४८,
नगर ग्रामिण ३४,
श्रीरामपूर ६,
कॅन्टोन्मेंट २७,
नेवासा २२,
श्रीगोंदा २१,
पारनेर २७,
अकोले ५,
राहुरी ११,
शेवगाव ११,
कोपरगाव ०५,
जामखेड १२,
कर्जत २६
मिलिटरी हॉस्पिटल ३
अशा रुग्णांचा समावेश आहे.
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा रुग्णालय अहमदनगर)
STAY HOME STAY SAFE
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहि तीवरच विश्वास ठेवा
खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका