अहमदनगर - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे आज जिल्हावासियांशी थेट संवाद साधणार आहेत. ते आज, रविवार, दिनांक २ ऑगस्ट, २०२० रोजी सकाळी ११ वाजता फेसबुकवर ऑनलाईन येऊन जिल्हावासियांना संबोधित करणार आहेत.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हेे लाईव संवादात कोरोना प्रादुर्भाव आणि उपाययोजना या विषयावर बोलणार आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर (@InfoAhmednagar) या फेसबुक पेजवर सकाळी ११ वाजता लाईव्ह येणार आहेत.
या लाईव्ह संवादात जिल्हावासियांनी अवश्य सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा लाईव्ह संवाद पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..