मुख्यमंत्री म्हणाले, लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, यामुळे गाफील राहून चालणार नाही. सदैव सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ही शिथिलता दिल्यानंतर वाढताना दिसतो आहे. त्यामुळे काटेकोर नियोजन करुन आणि नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्यासंदर्भातील आग्रह धरला पाहिजे.
लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांची यामध्ये मोठी भूमिका आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. मृत्यू दर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. धारावी आणि वरळी येथील प्रादुर्भाव रोखण्यात आपण यश मिळवले.
'चेस द व्हायरस'
आता इतर आजार असणार्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. सर्व जिल्ह्यात आपण 'मिशन झीरो' अंतर्गत 'चेस द व्हायरस' असे केले पाहिजे. जिल्ह्यातील डॉक्टरांचा टास्क फोर्स आपण निर्माण केला आहे. या टास्क फोर्सने त्याचे काम सुरू केले आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले.