मुंबई - देशाच्या स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी पोलीस पथकाने ध्वजास सलामी दिली. निवासस्थानातील अधिकारी, कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय ठाकरे सरकारमधील मंत्रिमंडळाने राज्यात ठिकठिकाणी सोशल डिस्टन्स पाळून ध्वजारोहण केले. प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.