शेवगाव - तालुक्यातील आव्हाणे बु. येथील धडाडीचे युवा नेतृत्व कचरू चोथे यांची नुकतीच भाजप किसान आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
भाजप मध्ये विविध पदांवर काम करताना दुष्काळ, पातपाणी, ऊस भाव वाढ, दुध भाववाढ आदी प्रश्नांवर लढा दिला. या कामाची दखल घेऊन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पक्ष नेतृत्वाने जिल्हा किसान आघाडीचे सारथ्य चोथे यांच्या हाती सोपविले आहे.
या निवडीबद्दल माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. सुजय विखे, आ. राधाकृष्ण विखे, आ. मोनिका राजळे, शिवाजी कर्डीले, बबनराव पाचपुते, भानुदास बेरड, अभय आगरकर, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, वजीर पठाण, अभय आव्हाड, बापूसाहेब पाटेकर, बापूसाहेब भोसले आदींनी अभिनंदन केले आहे.
शेतकरी प्रश्नांना वाचा फोडू : चोथे
भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोचविण्यावर भर देण्यात येईल. शेतकरी प्रश्नांना वाचा फोडून प्रसंगी त्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलनाचे हत्यारही उपसले जाईल, अशी ग्वाही चोथे यांनी निवडीनंतर MBP Live24 सोबत बाेलताना दिली.