माजी राष्ट्रपतींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची चाचणी करुन काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना टेस्ट करून स्वतःला आयसोलेट करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

माजी केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी सोमवारी दुपारी ट्विट करून लिहिले, की रुग्णालयात दुसऱ्या एका त्रासासाठी गेलो होतो. यावेळी माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जे लोक गेल्या आठवड्यापर्यंत माझ्या संपर्कात आले त्यांना आवाहन करतो की त्यांनी आपली कोरोना टेस्ट करून स्वतःला आयसोलेट करून घ्यावे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !