अहमदनगर - मानाच्या देशमुख गणपतीची उत्थापन पूजा जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते करण्यात आली. रविवारी सकाळी सनई चौघडयाच्या मंजुळ सुरात फुलांनी सजवलेल्या कृत्रीम हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
भिंगारच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली. कोरोना कोविड विषाणूचा संसर्ग पसरु नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्यात आले. याप्रसंगी मोजकेच भाविक उपस्थित होते. भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.