चारशे वर्षांपूर्वीचा 'हा ऐतिहासिक' तलाव भरलाय तुडूंब

अहमदनगर - नगर तालुकयातील भातोडी परिसरात असलेला तलाव सध्या पावसाच्या पाण्याने पूर्ण भरला आहे. चारशे वर्षांपूर्वी निर्मिती झालेला हा तलाव सन १९९२ नंतर प्रथमच पूर्णपणे भरला आहे. या तलावात सध्या १४ दशलक्ष घनफूट पाणी साचलेले आहे. त्यामुळे भातोडी गावासह परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे.

भातोडी तलावाचा ताजा व्हिडिओ

भातोडी तलावाची एकूण साठवणक्षमता ३७ दशलक्ष घनफूट हाेती. तलाव पूर्णपणे भरल्यामुळे मेहेकरी नदीच्या पात्रात तलावातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. भातोडी, पारगाव, पारेवाडी, चिचोंडी पाटील, आठवड, सांडवे, मांडवे, दशमीगव्हाण, आदी गावांतील शेतकरी वर्ग सुखावला आहे. अहमदनगर सकाळचे बातमीदार दत्ता इंगळे यांनी या तलावात साठलेल्या पाण्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, तब्बल चारशे वर्षांपूर्वी बांधलेल्या या तलावात सध्या खूप गाळही साचलेला आहे. हा गाळ काढण्याची मागणी प्रशासनाने केली होती. आता तलाव पूर्ण भरल्यामुळे नदीपात्रात पाणी सोडले आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशाराही दिलेला आहे. 

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !