'मासुम'च्या मूल्यांकनात भाई सथ्था नाईट हायस्कूल अव्वल

अहमदनगर - महाराष्ट्रातील रात्र शाळांच्या प्रगतीसाठी व रात्र शाळांमधील माध्यमिक विभागात प्रवेशित विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ होण्यासाठी मासूम सेवाभावी संस्था प्रयत्नशील आहे. संचालिका निकिता केतकर यांनी महाराष्ट्रातील एकूण 85 शाळांमध्ये हे कामकाज सुरू केले आहे. राज्यात अनेक विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन केले आहे. 

या संस्थेअंतर्गत मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा नगर जिल्ह्यातील चार शाळांमधील विद्यार्थी लाभ घेत आहेत. मासूम या संस्थेने संस्थेअंतर्गत शैक्षणिक कार्य चालणाऱ्या महाराष्ट्रातील शाळांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी मार्च 2020 परीक्षा निकालाच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले.

त्यामध्ये भाई सथ्था नाईट हायस्कूल ही सर्वात जास्त विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट करणाऱ्या शाळांच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकाची शाळा ठरली आहे सर्व शाळांमधून एकूण 1,598 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1,336 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून राज्यात गुणानुक्रमे प्रथम दहा क्रमांक काढण्यात आले. 

त्यामध्ये भाई सथ्था नाईट हायस्कूलमधील प्रीती भालेकर चौथा क्रमांक 89%, सुरेखा शिंदे व अभिषेक भागडे सातवा क्रमांक 84% व अनिल काळे दहावा क्रमांक या चार विद्यार्थ्यांनी राज्यात टॉप टेनमध्ये स्थान मिळविले. तर विषयाच्या क्रमवारीत विज्ञान विषयात 98 गुण मिळवून महेश बर्डे हा राज्यात प्रथम आला आहे. 

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर व अंकुश जगदाळे, शशिकांत गवस, अशोक चिंधे, संदीप सूर्यवंशी, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, यांच्यासह अजित बोरा, संजय जोशी, ब्रिजलाल सारडा, सुनील रामदासी, विद्यालयाचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, प्राचार्य सुनील सुसरे यांनी अभिनंदन केले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !