मधासारख्या गोड पदार्थाचे इतर कितीतरी पदार्थांसोबत सेवन करता येतं. शिवाय हे आपल्या आरोग्यासाठी लाभदायकही ठरते. मध आणि लिंबू या दोन्ही पदार्थांच्या सेवनामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपली रोग प्रतिकारशक्ती चांगली असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ आपल्या आहारात असणे आवश्यक आहे.
खरं तर मध आणि लिंबू हे दोन्ही आपल्या रोजच्या वापरातले पदार्थ आहेत. सगळ्यांच्या घरात मध आणि लिंबू असते. मधाचा वापर आपण फार कमी करतो, अगदी स्पेशल डिश बनवतानाच आपण मधाची बाटली खोलतो. त्यातल्या त्यात ते मध अगदी अस्सल असले तर आई अगदी जपून ते वापरते. लिंबाचा वापर हा सतत होत असला तरी गरजेपुरताच होत असतो. कधी लिंबू सरबत हवे असेल, तरच लिंबू कापला जातो.
या दोन्ही पदार्थांचे असे फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही सुद्धा या पदार्थांचा फक्त गरजेपुरताच वापर करणार नाही. तर स्वत:चे आयुष्य सुदृढ राखण्यासाठी रोजच याचा वापर कराल. कारण या दोन्ही पदार्थांच्या सेवनामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. जीवनसत्त्व क ने परिपूर्ण असलेल्या लिंबाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.