‘लिपिक’ नाही, आता ‘महसूल सहायक’ म्हणायचं !

मुंबई - महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची राज्यातील महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘लिपिक गट क‘ कर्मचाऱ्यांची तांत्रिक लिपिक ऐवजी ‘महसूल सहायक‘ असे पदनाम करावे, अशी मागणी होती. राज्य शासनाने महसूल कर्मचारी संघटनेची ही मागणी मान्य केली आहे. या कर्मचाऱ्यांना पदनाम बदलामुळे शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !