खुशखबर ! 'बिग बी'ची कोरोनावर मात

मुुंबई - बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. दस्तुरखुद्द बिग बी यांनीच ही माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. २२ दिवस नानावटी रुग्णालयात कोविडवर उपचार करत असलेल्या अमिताभ बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 


स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन आपल्या तब्बेतीची माहिती दिली आहे. तसेच आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे देखील त्यांनी मनापासून आभार मानले आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मी आता घरी आलो आहे.

 देवाच्या कृपेने, आई-वडिलांच्या आशीर्वादाने, मित्रांच्या आणि चाहत्यांच्या प्रार्थनांनी आणि मी प्रेमाने मी बरा झालो आहे. तसेच नानावटी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या काळजीमुळे मी आज हा दिवस पाहू शकलो आहे. लवकरच ते चाहत्यांना दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !