देवा आज मला तुझ्याशी खूप खूप
हितगुज करायचय
मनातलं सारं काही
तुझ्याजवळ बोलायचय !!१!!
देवा कृपा करून संपव
ना रे ही महामारी
विनाकारण माणस मरू
राहिलेत रे बिचारी !!२!!
इतरवेळी माणस मरायची
तेव्हा काही नव्हतं रे वाटत
आता अंत्य दर्शनालाही माणूस
दूरच उभा राहतोय हात जोडत !!३!!
मृत्यू हा अटळ आहे एक दिवस
येणारच आहे प्रत्येकाला
पण या महामारी तून मृत्यू थांबव रे
घरातले कुणीच नसत रे अंत्यविधीला !!४!!
जरी विज्ञान युगात जगतोय आम्ही
पण खूप काही गोष्टी तुझ्याच आहेत हाती
अन्याय अत्याचार करणाऱ्या माणसाची
नक्कीच फिरली होती मती !!५!!
माणसाला माणसाची
किंमत कळलिये आता
कर ना रे देवा
या कोरोनाची तूच सांगता !!६!!
- आशा पाटील (अहमदनगर)