अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. हे अधिकारी गेले काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.
वयाची पन्नाशी ओलांडलेल्या या अधिकार्यावर आठवडाभरापासून उपचार सुरू होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यालाही करोना चाचणी करण्यात आलेली आहे. दरम्यान, या अधिकाऱ्याच्या मृत्युमुळे झेडपी वर्तुळात शोककळा पसरली आहे. झेडपीचे अधिकारी आणि पदाधिकारी यांनी याबद्दल शोक व्यक्त करुन, इतर अधिकारी आणि कर्मचारी यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.