सावधान ! यामुळेही होऊ शकते कोरोना संक्रमण

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

हेल्थ ब्युरो - जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) कोरोना महामारी अजून रौद्र रुप धारण करू शकतो, असा इशारा दिला आहे. या व्हायरसच्या प्रसाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिली आहे. सहा प्रकारे कोरोना व्हायरस कोणकोणत्या माध्यमातून पसरू शकतो याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.


  1. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे 
  2. संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा खोकण्यातून लाळेच्या ड्रॉपलेट्समधून व्हायरस हवेत पसरल्यास
  3. संक्रमित व्यक्तीच्या रक्तामुळे संक्रमण पसरण्याचा धोका 
  4. आईला कोरोनाची लागण झाली असल्यास बाळालाही कोरोनाचं संक्रमण होऊ शकतो
  5. व्हायरसच्या विळख्यात अडकलेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यामुळे 
  6. संक्रमित व्यक्तीने उघड्यावर मलविसर्जन केल्यास व्हायरसचा प्रसार इतर व्यक्तींपर्यंत होण्याची शक्यता
या सहा प्रकारेही कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहेनम गेब्रयेसस यांनी कोविड १९ च्या महामारीबाबत धोक्याची सुचना दिली होती. त्यांनी सांगितले की, जगभरात दिवसेंदिवस कोरोनाची माहामारी अधिकच धोकादायक होत चालली आहे. आता कोरोनासोबतच जगावं लागणार आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !