अमेरिकेत ऑनलाइन शिक्षण यशस्वी ठरलले नाही. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. एकीकडे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प शाळा सुरू ठेवण्यावर भर दिला आहे. परंतु, शिक्षकांनी त्यावर संपाचा इशारा दिला आहे. शाळांमध्ये काेराेनाला प्रतिबंध करण्यासाठी व्यवस्था नाही. बहुतांश खाेल्यांत पुरेशी हवा नसते. मास्कही कमी पडू लागले आहेत, अशी वस्तुस्थिती समोर आली आहे.
अमेरिकेत राजकीय नेत्यांनी स्वत:च्या सुरक्षेची पुरेशा व्यवस्था केली. परंतु, शिक्षकांना त्यांच्या नशिबावर साेडले आहे. त्यामुळे ही परिस्थिी ओढवली आहे. अमेरिकेत काेराेनाचे आतापर्यंत ४५ लाख ६८ हजार ३७५ रुग्ण आढळून आले आहेत. तर १ लाख ५३ हजार ८४८ जण मृत्युमुखी पडलेले आहेत.