बीड - बुधवारी दुपारी जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. कारण यंदा बहुतांश विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले आहेत. एका विद्यार्थ्याने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण त्याला सर्व विषयात ३५ गुण मिळाले आहेत.
कोण आहे हा विद्यार्थी
• धनंजय नखाते असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील उमरी येथे रहातो. त्याला सर्व विषयांत ३५ गुण मिळाले आहेत. अत्यंत हालाखीच्या परिस्थिती त्याने हे यश मिळवले आहे. गावकऱ्यांनी त्याचे स्वागत करून त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.