तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात एकही दौरा केलेला नाही. ते एका ठिकाणी बसूनच राज्यातील कामकाज पाहत आहेत. यावर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. शरद पवार हे 80 वर्षांचे असूनही राज्यभरात फिरत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी एकही दौरा केलेला नाही. मुख्यमंत्री एकाच भागात जाऊन बसले तर, निर्णय प्रक्रियेत अडचणी निर्माण होतील. यामुळे त्यांनी मुख्य ठिकाणी बसून सर्वांवर लक्ष ठेवावे, कमतरता असेल ती सांगावी. असा आमचा आग्रह असल्याचे पवार म्हणाले.
आपण मुख्यमंत्री होता तेव्हा लातूरचा भूकंप झाला होता. आपण तेथे जाऊन मदतकार्य केले होते. पण आता मुख्यमंत्र्यांवर टीका होत आहे की, मुख्यमंत्री कुठेही जात नाही. असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले, लातूरचा जो भूकंप होता, तर तो एका जिल्ह्याचा भाग होता. आताचं संकट हे संपूर्ण राज्यातील आहे. त्यामुळे त्यांनी एका ठिकाणी थांबूनच परिस्थितीवर लक्ष ठेवले पाहिजे, असे मला वाटते.