हा प्रकार गुरूवारी मध्यरात्री घडल्याचे सांगितले जात आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना संशयीत म्हणून एका महिले दाखल करण्यात आले होते. तेथेच एका विकृत तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत तत्काळ कारवाई करत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पनवेल पोलिस अधिक तपास करत आहेत.
धक्कादायक ! क्वारंटाईन महिलेवर अत्याचार
Friday, July 17, 2020
मुंबई - पनवेल येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाईन असलेल्या एका युवकाने बलात्कार केला आहे. यामुळे पनवेल मधील क्वारंटाईन सेंटरची सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशंयीतांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईनची व्यवस्था कोण गाव येथील इंडिया बुल्स येथे केलेली आहे. तेथील इमारतीतच हा धक्कादायक प्रकार घडला.
Tags