अयोध्या राम मंदिराचे पुजारी कोरोना पॉझिटिव्ह

अयोध्या - येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राम मंदिराची पूजा आणि पायाभरणी करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्यासमवेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भगवान यांच्यासारख्या व्यक्ती असणार आहेत. परंतु, या मंदिराचे पुजारी व तेथील १६ पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. 


यात अग्निशमन दलाचे सैनिक, पीएसी आणि पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. ही माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचार्‍यांमध्ये गोंधळ उडाला आहे. आता इतर कोण कोण त्यांच्या संपर्कात आले याची चौकशी केली जात आहे. त्यांचीही तपासणी केली जाणार आहे. 

जे पुजारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, ते मुख्य पुजाऱ्यांचे सहायक आहेत. मुख्य पुजारी व इतर चार पुजारी राम ललाची सेवा करतात. त्यामुळे हे सहायक पुजारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ मुख्य पुजारी व इतर सहकाऱ्यांचा कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मंदिराच्या रक्षणासाठी अडीच हजाराहून अधिक पोलिस तैनात केलेले आहेत. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !