माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपचे दिग्गज नेते मुरली मनोहर जोशी यांना देखील बोलावण्यात येणार आहे. तसेच उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांना बोलवले जाऊ शकते. आलोक कुमार, मिलिंद परांडे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सहभागी होऊ शकतात. मोहन भागवत आणि अन्य काही नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सहभागी होऊ शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. व्हीआयपी अतिथींची संख्या केवळ ५० पर्यंत असेल. याशिवाय अयोध्याच्या पाच-सहा भागात एक मोठा स्क्रीन बसविला जाईल, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास श्रीराम लला यांना मणिरामदास छावणीच्या वतीने ४० किलो चांदीची शीळा अर्पण करतील. ती पूजेच्या वेळी मंदिराच्या पायाभरणीत वापरली जाईल.