बेभान कोसळलेला पाऊस जरा शांत झाला...
आठवणींनी भरलेलं आभाळ मोकळं झालं..
अन मोगऱ्याच्या फुलांची गच्च भरलेली फांदी,
थेंबांच्या ओझ्यानी गहिवरून गेली....
मोहोरलेली ती फांदी टपटप बरसू लागली....
त्यांच्या भेटीचा गंध उनाडपणे दरवळू लागली .....
तो जाऊनही बराच वेळ गेला, पण........
गंधित मोगऱ्याने वसंताची
भक्तिभावे पूजा करून
ईशवराच्या चरणाशी वाहून घेतले.....
प्रेमाचे निर्माल्य बनून आयुष्य समर्पित केले....
पुन्हा एकदा मनाच्या आभाळात
वसंताची पूजा करण्यासाठी ....!
- छाया रसाळ (सखीसावली)