अमेरिकेच्या युनायटेड एअरलाईन्सने भारत आणि अमेरिकेदरम्यान, १७ जुलै ते ३१ जुलै या काळात एकूण १८ उड्डानं आकाशात झेपावणार आहेत. तर, १८ जुलै ते ते १ ऑगस्ट या काळात फ्रान्सकडून दिल्ली, मुंबई, बंगळुरूच्या दिशेनं येणाऱ्या २८ उड्डाणांची सुरुवात केली जाणार आहे.
युकेसोबत अशा प्रकारचा करार शक्य तितक्या लवकर करत दर दर दिवशी लंडन आणि दिल्ली दरम्यान, दोन उड्डाणांच्या सुविधेचा प्रस्ताव असल्याचं ते म्हणाले. हरदीप पुरी म्हणाले की, इतर देशांकडूनही 'एअर बबल'साठीची विचारणा होत आहे. परंतु, आपल्याला या घडी हाताळता येतील तितक्याच प्रवाशांना अनुमती द्यावी लागणार आहे.