नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनल्सचे प्रसारण बंद

नवी दिल्ली - नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनल्स प्रसारण बंद करण्यात आले आहे. नेपाळ सरकारने ही बंदी घातल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही चॅनल्स नेपाळमधल्या केबल प्रोव्हायडर्सनी बंद केली आहेत. यासाठी नेपाळ सरकारने सध्या तरी काहीही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही. 


नेपाळमध्ये सध्या दूरदर्शन सोडून एकही भारतीय न्यूज चॅनल दिसत नाही. नेपाळमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नेपाळचे माजी उपपंतप्रधान आणि सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ म्हणाले आहेत की, नेपाळ सरकार आणि आमचे पंतप्रधान यांच्या विरोधात भारतीय माध्यमे विनाआधार प्रचार करत आहेत. 

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या काही निर्णयांमुळे देशाच्या संसदेपासून अगदी नेपाळमधल्या रस्त्यांपर्यंत त्यांना विरोध दर्शवला जातो आहे. तथापि, सरकारने कोणताही आदेश दिलेला नाही. मात्र आम्ही भारतीय न्यूज चॅनल्स दाखवणं बंद करत आहोत, असे  नेपाळमधील केबल प्रोव्हायडर्सनी एका वृत्तसंस्थेला सांगितले आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !