अहमदनगर - जिल्ह्यात आज सायंकाळी १० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. नगर शहरात ०२, कोपरगाव ०३, पाथर्डी ०१, मुंगी (शेवगाव) ०१, नेवासा फाटा (नेवासा) ०१, श्रीरामपूर ०१ आणि कासार दुमाला (संगमनेर) ०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
दरम्यान आज सकाळी २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज जिल्ह्यातील ३७ कोरोना ग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज दिवसभरात १५० व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३६९ आहे. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण १६० आहेत. तर कोरोनामुळे १५ जणांचे मृत्यू झाले आहेत. एकूण रुग्ण संख्या ५४४ आहे, अशी माहिती नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर यांनी दिली आहे.