स्मार्टफोन प्रोसेसर बनवण्यासाठी प्रसिद्ध कंपनी क्वालकॉम ने नवीन फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान आणले आहे. या अंतर्गत ५ मिनिटात स्मार्टफोनला शून्य ते ५० टक्क्यांपर्यंत चार्ज केला जावू शकतो. तसेच, स्मार्टफोन फुल चार्ज होण्यासाठी केवळ १५ मिनिटाचा वेळ लागतो, असे म्हटले आहे.
सन २०१७ मध्ये याच कंपनीने क्विक चार्ज 4+ टेक्नोलॉजी लाँच केली होती. त्याचेच आता अपग्रेड व्हर्जन आले आहे. हे नवीन तंत्रज्ञान जुन्याच्या तुलनेत ४ पट अधिक आहे. बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी यात क्वॉलकॉम बॅटरी सेव्हर आणि अपडेप्टर कॅपेबिलिटी साठी स्मार्ट आयडेंटिफिकेशन यासारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
सध्या तरी या तंत्रज्ञानाची चाचणी सुरु आहे. तरीही लवकरच हे तंत्रज्ञान बाजारात येईल. त्यामुळे वारंवार बॅटरी लो होणे, पॉवर बँक ठेवावी लागणे, या त्रासातून मोबाईलधारकांची सुटका होईल. यापूर्वी काही कंपन्यांनी कमी वेळेत मोबाईल चार्ज होतो, असा दावा केलेला आहे. प्रत्यक्षात मात्र २० मिनिटांच्या आत कोणताही मोबाईल पूर्ण चार्ज होत नाही.
(image source : needpix.com)