अहमदनगर – करोना पासून वाचण्यासाठी मुलांच्या निरोगी शरीरा बरोबरच निरोगी मनही गरजेचे आहे. जर मना बरोबर शरीर निरोगी असेल, तर कोणत्याही परीस्थिला तोंड देण्याची क्षमता आपल्यात येते. यासाठी मुलांनी भरपूर खेळा, भरपूर व्यायाम करून भरपूर ऑक्सिजन घेऊन आपली प्रतिकारशक्ती वाढवावी, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश महेश नातू यांनी केले.
जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या वतीने रिमांडहोम मधील विद्यार्थ्यांना कापडी मास्क व सॅनिटाझरचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नातू यांनी विद्यर्थ्याना करोना पासून बचाव होण्यासाठी काय काळजी घ्यायची, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शहर वकील संघटनेचे अध्यक्ष भूषण बऱ्हाटे, उपाध्यक्ष सुहास टोणे, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे अधिक्षक मोहिनीराज घावटे, रिमांडहोमच्या अधिक्षक पोर्णिमा माने, सागर पादीर, एम पी. कचरे, अधिकारी नरेंद्र देशमुख, सुनील दस्सुर, रेखा जाधव, शीतल प्रभुणे उपस्थित होते.
प्रास्ताविकात न्या. पाटील म्हणाले, करोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत सर्व नियमांचे पालन करूनच या रोगापासून आपण वाचू शकतो. नागरिकांमध्ये जनजागृती साठी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून सातत्याने काम करत आहे.
वकील संघटनेचे अध्यक्ष भूषण बऱ्हाटे यांनी मनोगत व्यक्त केले. रिमांडहोमच्या अधिक्षिका पोर्णिमा माने यांनी लॉकडाऊन मधील मुलांच्या दिनचर्येची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सागर पादीर यांनी केले. आभार जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे अधिकारी नरेंद्र देशमुख यांनी मानले.