सार्वजनिक ठिकाणी येताय ना ? मग मास्क बंधनकारक

केंद्रीय पथकाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी

अहमदनगर - नागरिकांचे सर्वेक्षण वाढवून संभाव्य रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना वेळेत उपचार मिळणेकोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी सोमवारी हे पथक अहमदनगरला आले होते. संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढवा, अशी सूचना दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने केली. 

ही परिस्थिती अशीच नियंत्रणात राहील, यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर, अॅंटीजेन चाचण्या होत आहेत. खाजगी प्रयोगशाळांतून तपासणी होत आहे. ऑगस्टअखेरपर्यंत जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या दीड लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी समितीला दिली.

केंद्गीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर येथील डॉ. अरविंद कुशवाह आणि डॉ. सितीकांता बॅनर्जी या दोन सदस्यीय पथकाने अहमदनगर येथे भेट दिली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांसोबत आढावा बैठक घेण्यापूर्वी या पथकाने जिल्हा रुग्णालय येथील कोविड हॉस्पिटल, दीपक हॉस्पिटल येथील कोविड हॉस्पिटल आदी ठिकाणी तसेच श्रमिकनगर आदी भागांची पाहणी केली. 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा  साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. साळुंके, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी त्यांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली. लगतच्या इतर जिल्ह्यापेक्षा अहमदनगर जिल्हयाची परिस्थिती नियंत्रणात आहे. ही परिस्थिती नियंत्रणात राहील यासाठी तयारी महत्वाची आहे, असे यावेळी सांगण्यात आले. 

ज्या व्यक्तींना इतर आजार आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा, महानगरपालिका, जिल्हा परिषद अशा सर्व यंत्रणा चांगले काम करीत असल्याचे यावेळी डॉ. कुशवाह यांनी नमूद केले.  

कोरोना प्रतिबंधासाठी आता लॉकडाऊन हा पर्याय नाही. 
मात्र अनलॉक करताना नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन आवश्यक
सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे
हात वारंवार धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे 
यंत्रणांनीही त्यासाठी आग्रह धरला पाहिजे. 
लोकांमध्ये अधिक जाणीव निर्माण करुन द्यावी
कोरोनावर अजून औषध उपलब्ध नाहीय..
त्यामुळे मास्क वापरला तर प्रादुर्भाव रोखू शकतो

ग्रामीण भागात लोकसंख्या काही भागात विखुरल्यामुळे संसर्गाचा प्रादुर्भावाची शक्यता कमी असली तरी तेथे वेळेवर सर्वेक्षण आणि आजारी रुग्णांना वेळेत उपचार आदी बाबी महत्वाच्या आहेत, असे डॉ. कुशवाह म्हणाले. यापुढील काळात तालुकापातळी आणि  गावपातळीवरही अधिक सूक्ष्म नियोजन आवश्यक आहे. मृत्यू होणार नाहीत, यासाठीचा प्रयत्न असला पाहिजे.

डॉ. बॅनर्जी म्हणाले, कोरोनासंदर्भात लोकांमधील भीती कमी केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. त्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संस्थांनी प्रशासना इतकीच महत्वाची भूमिका बजावली पाहिजे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी अधिक व्यापक पद्धतीने लोकांपर्यंत माहिती पोहोचवली पाहिजे.

 जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढत असल्याचे सांगितले. येत्या ऑगस्टअखेरपर्यंत जिल्ह्यात दीड लाख चाचण्या होतील, असे नियोजन असल्याचे ते म्हणाले. या बैठकीला जिल्हा आरोग्य यंत्रणा, मनपा आरोग्य विभाग यांच्यासह संगमनेर, राहाता, पाथर्डी आणि श्रीरामपूर येथील तहसीलदार आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !