जूनमध्ये गाड्यांची विक्री तिप्पट
परंतु, जून २०१९ च्या तुलनेत मारुतीच्या विक्रीत ५४ टक्के घसरण आली आहे. जून २०१९ मध्ये कंपनीने १,२४,७०८ गाड्या विकल्या होत्या. कोरोना विषाणूमुळे मेमध्ये मारुतीचे बहुतांश प्लँट आणि शोरूम बंद होते. जूनमध्ये अनलॉक-१ अंतर्गत मिळालेल्या सवलतीनंतर वाहनांच्या विक्री वाढली आहे. मारुती कंपनीने अधिकृतपणे जारी केलेल्या आकडेवारीनुसार जूनमध्ये कंपनीची देशांतर्गत विक्री ५३,१३९ वाहने विकली.
मारुती कंंपनीने २६ हजार कॉम्पॅक्ट कार विक्री केली. तर ४२८९ गाड्यांची निर्यात झाली आहे. जून तिमाहीत कंपनीने एकूण ७६,५९९ वाहने विकली. यामध्ये तिची देशांतर्गत विक्री ६६,१६५ युनिट होती. याशिवाय टोयाेटा वाहनांची एकूण विक्री जूनमध्ये ३,८६६ होती. तर ह्युंदाई लिमिटेडने जूनमध्ये २६,८२० गाड्या विकल्या.