जगातील तिसरे मोठे क्रिकेट मैदान लवकरच राजस्थानात

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येत्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानाला मागे टाकत अहमदाबाद येथे जगातले सर्वात मोठे क्रिकेट मैदान काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले. या मैदानात 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. 


मेलबर्नच्या मैदानाची प्रेक्षकक्षमता ही 80 हजार एवढी आहे. यानंतर जगातले तिसरे मोठे क्रिकेट मैदानही भारतात तयार होणार आहे. राजस्थान क्रिकेट  असोसिएशनने याबद्दलची घोषणा केली असून, या मैदानाची क्षमता 75 हजार असणार आहे.

या मैदानासाठी जयपूरजवळील चौम्प गावाजवळ जमीन निश्चित केली असून, सुमारे 100 एकर जनिमीवर हे मैदान उभारले जाणार आहे. इनडोअर प्रक्टिस, कार पार्किंग यासह अनेक अत्याधुनिक सेवा या मैदानात दिल्या जाणार आहेत. हे मैदान तयार करण्यासाठी 350 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !