या प्रकरणाचा स्क्रीनशॉट तिने आपल्या टि्वटरवर शेअर केला. ही मोहीम नक्की कोणत्या दिशेने जाते आहे ते पाहा, असे कॅप्शन लिहीत तिने आपला राग व्यक्त केला. स्वत:ला भारतीय असल्याचा ज्वालाला प्रचंड अभिमान आहे. ती देशासाठी खेळते. परंतु, कोणी आपल्या देशप्रेमावर असा आक्षेप घेत टीका करणे तिला आवडले नाही. म्हणून तिने आपला राग व्यक्त केला. अर्थात तिने उत्तर देतानाही उद्वेग व्यक्त केला.
..म्हणून भडकली ज्वाला गुट्टा
Sunday, July 26, 2020
स्पोर्ट ब्युरो - भारताची स्टार बॅडटिंनपटू ज्वाला गुट्टा नुकतीच प्रचंड भडकली. त्याला कारणही तसेच होते. महिला चिनी वस्तूंच्या वापरावर बहिष्कार या सुरू झालेल्या मोहिमेदरम्यान तिला एका वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोवर एका युजरने कमेंट करत तिला चिनी संबोधण्याचा प्रकार घडला.