- विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील पाहणार कामकाज
एप्रिल २०१८ मध्ये जामखेड तालुक्यातील उल्हास माने यांच्या तालिमीतील काही मुले आणि मयत योगेश आणि राकेश यांचा राजकीय कारणावरून वाद झाला होता. या वादातून जामखेडला दुहेरी हत्याकांड झाले होते. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे, उल्हास माने, त्यांचे बंधू, दत्ता ऊर्फ स्वामी गायकवाड या सर्वांनी इतर आरोपींच्या सहाय्याने या दुहेरी खुनाचा कट रचला होता. तर २८ एप्रिल २०१८ रोजी पिस्तुलातून गोळ्या झाडून राळेभात बंधूंची निर्घृण हत्या केली होती.
या दुहेरी हत्याकांडातील आरोपी असलेल्या माने बंधूंनी जामीन मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली होती. या घटनेचे स्वरूप पाहून माने बंधू यांचा गुन्ह्यातील सहभाग पाहून सर्वोच्च न्यायालयानेही मानेचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी एक वर्षाच्या आत निकाली करण्यासंबंधी निर्देश दिले आहेत.